
बागेच्या हिरव्या विस्तारात पुष्प असे बहरते,
पाखर त्याच्या सुगंधात वाहून हसते;
हे धागे बंधनाचे,
त्यांना असे काही जोड़ते,
जणू सृष्टिच्या बहु चमत्कारातले हे एक...
हे धागे बंधनाचे...
त्यांना असे काही जोड़ते...
नभाच्या मंडपातुन येणारे थेंब पावसाचे,
व्रुक्षान्ना...पानांना एक नवी ऊर्जा देते;
झिमझिम पाण्याने,
मी ओलेचिम्ब होते,
बेभान होउन पानांसह मी ही झुलू लागले...
झिमझिम पाण्याने...
मी ओलेचिम्ब होते...
उजाळ पहाटे कोकीळ गीत मधुर गाते,
सुरांच्या जाळ्यात मन माझे हरवते;
एक उन्हाड दिवस असे,
रंग अनेक दाखवते,
मावळत्या सूर्यात माला माझे प्रतिबिंब दिसू लागते...
एक उन्हाड दिवस असे...
रंग अनेक दाखवते...
निसर्गाचे विविध रूप पाहून मन भरून येते,
जीवनाचे सार आता समजू लागते;
अर्थ नात्यांचे,
मूल्य अस्तित्वाचे,
इन्द्रधनुषाच्या सप्तारंगांत आयुष्याचे वर्ण दिसू लागले...
अर्थ नात्यांचे...
मूल्य अस्तित्वाचे...
हे धागे बंधनाचे...
अर्थ नात्यांचे...
नवजीवन देऊन गेले...