Wednesday, July 15, 2009






बागेच्या
हिरव्या विस्तारात पुष्प असे बहरते,

पाखर त्याच्या सुगंधात वाहून हसते;

हे धागे बंधनाचे,

त्यांना असे काही जोड़ते,

जणू सृष्टिच्या बहु चमत्कारातले हे एक...

हे धागे बंधनाचे...

त्यांना असे काही जोड़ते...





नभाच्या मंडपातुन येणारे थेंब पावसाचे,

व्रुक्षान्ना...पानांना एक नवी ऊर्जा देते;

झिमझिम पाण्याने,

मी ओलेचिम्ब होते,

बेभान होउन पानांसह मी ही झुलू लागले...

झिमझिम पाण्याने...

मी ओलेचिम्ब होते...





उजाळ पहाटे कोकीळ गीत मधुर गाते,

सुरांच्या जाळ्यात मन माझे हरवते;

एक उन्हाड दिवस असे,

रंग अनेक दाखवते,

मावळत्या सूर्यात माला माझे प्रतिबिंब दिसू लागते...

एक उन्हाड दिवस असे...

रंग अनेक दाखवते...




निसर्गाचे विविध रूप पाहून मन भरून येते,

जीवनाचे सार आता समजू लागते;

अर्थ नात्यांचे,

मूल्य अस्तित्वाचे,

इन्द्रधनुषाच्या सप्तारंगांत आयुष्याचे वर्ण दिसू लागले...

अर्थ नात्यांचे...

मूल्य अस्तित्वाचे...




हे
धागे बंधनाचे...

अर्थ नात्यांचे...

नवजीवन देऊन गेले...

6 comments:

  1. good work!!! at least somebody is posting marathi stufff.....this reminds me of shanta shelke :)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. मायबोलीतली सुंदर ही कविता मी जशी वाचली

    समुद्रातली एक उंच लाट जनू माझ्या मनात साचली



    मनातनं कानात शिरून ती रागवून म्हणाली,

    "लेका, आतातरी तू जराशी लाज वाटुन घे

    रम्य या निसर्गाला काहीतर दाद दे"



    "धरती तापत होती तेव्हा तर घातल्या होत्या तू शिव्या फ़टा-फ़ाट

    वह्राडाचा शेतकरी म्हणतो,"च्या बहिण,हा कोण ज्याला माझ्यापेक्षाही जास्त पावसाची वाट?""



    हे दोन शब्द ऎकुन माझ्या डोक्यात पडला मोठा प्रकाश

    ताबडतोब मी मांडला पेन,पेन्सिल,रबर आणि वहीचा ताश



    दोन तासांनंतरही वही होती कोरी ति कोरीच

    मेंदु माझा सुचवतो,भाऊ,आपल्याला झेपणारी गोष्ट नाही ही मुळीच



    शेवटी मला कळलं कविता नाही आपल्या बस ची बात

    शलाकाचा सुंदर चालतो यात मेंदु आणि हात.

    ReplyDelete
  4. @vikrant...
    this is one of the best comments i've received till now!!
    thank u!
    cheers!
    P.S. : u write well!

    ReplyDelete
  5. How beautiful the words are?
    they please Us all,
    they bless us all!
    with the happiness ...
    which never losts!
    And can be remembered back...
    Words are the persons whose minds,
    are nothing but the blossoms!
    Shalaka's universe becomes...
    a poets world!
    mine is nothing the others...
    but is the same ...
    for all Universe sake!
    Lets be all Bissy to make all Bissy!
    -Meghashyam Dalvi, Nagpur

    ReplyDelete